भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें जाणोनि वेदमत । संतसेवा सदोदित

aisen janoni vedamat | santaseva sadodit

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐसें जाणोनि वेदमत । संतसेवा सदोदित ॥१॥ पुराणे शास्त्रें अनुवादिती । संतसेवन दिनरातीं ॥२॥ संतचरणीं ज्यांचें मन । तयां सुखा काय उणें ॥३॥ एका जनार्दनीं भावें । संतचरणीं लीन व्हावें ॥४॥