भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसे विश्रांतींचे स्थान । आणिके ठायीं नाहीं जाण

aise vishrantinche sthan | anike thayin nahin jan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐसे विश्रांतींचे स्थान । आणिके ठायीं नाहीं जाण ॥१॥ तें हें जाणा पंढरपुर । मुक्त मुमुक्षुचें माहेर ॥२॥ जगीं ऐसें स्थळ । नाहीं नाहीं हो निर्मळ ॥३॥ एका जनार्दनीं निकें । भूवैकुंठं नेटकें ॥४॥