भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसे संतभार ऐसें भीमातीर । ऐसा जयजयकार सांगा कोठें

aise santabhar aisen bhimatir | aisa jayajayakar sanga kothen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐसे संतभार ऐसें भीमातीर । ऐसा जयजयकार सांगा कोठें ॥१॥ समुद्रवलयांकित तीर्थे असतीं पावन । परी ऐसें महिमान नाहीं कोठें ॥२॥ ऐसा नामघोष आनंद सोहळा । न देखे आणिके स्थळां माझे नेत्रीं ॥३॥ एका जनार्दनीं पंढरीवांचुनीं । आनंद माझें मनीं नाहीं कोठें ॥४॥