भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसे बहुत दिन तयांसी लोटले । उभयतां कळलें गुज त्याचें

aise bahut din tayansi lotale | ubhayatan kalalen guj tyachen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐसे बहुत दिन तयांसी लोटले । उभयतां कळलें गुज त्याचें ॥१॥ स्त्रियेचें चरित्र न कळे ब्रम्हादिकां । उभयतां विचार देखा करिताती ॥२॥ दोघी दो बाजूंस करिती शयन । कर उचलोनि धरती ह्रदयीं ॥३॥ सावध होउनी पाहे कर चोरी गेला । एका जनार्दनीं त्याला शिक्षा करुं ॥४॥