भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसे बहु दिन लोटले । दामा नामयासी बोले

aise bahu din lotale | dama namayasi bole

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐसे बहु दिन लोटले । दामा नामयासी बोले ॥१॥ जाउनी बैसशी राउळीं । सुखें सदा सर्वकाळीं ॥२॥ नाहीं प्रपंचाचा घोर । पुढें कैसा रे विचार ॥३॥ नको धरुं छंद मनीं । विनवी एका जनार्दनीं ॥४॥