भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसा ज्याचा एक भाव । तेथें नाहीं द्वैता ठाव

aisa jyacha ek bhav | tethen nahin dvaita thav

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐसा ज्याचा एक भाव । तेथें नाहीं द्वैता ठाव ॥१॥ द्वैत अद्वैत हारपलें । अवघें एकरुप जाहलें ॥२॥ संकल्प विकल्प विराला । अवघा देहीं देव जाहला ॥३॥ एका जनार्दनीं ठाव । स्वयमेव भरला देव ॥४॥