भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसा चिंतावोनियां मनीं । म्हणे निमाली पूतना भगिनी । माझिया राज्या आली हानी । म्हणोनि माभळभट पाठविला

aisa chintavoniyan manin | mhane nimali putana bhagini | majhiya rajya ali hani | mhanoni mabhalabhat pathavila

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ऐसा चिंतावोनियां मनीं । म्हणे निमाली पूतना भगिनी । माझिया राज्या आली हानी । म्हणोनि माभळभट पाठविला ॥१॥ तंव पिढेदान त्या प्राप्त झालें । नवलचि हें अपूर्व ऐकिलें । येऊनि आम्हातें जाणविले । नव्हें बाळ हें तान्हुलें श्रीहरी ॥२॥ मग म्हणे वो रिठासुरा । जाऊनि तुम्ही बाळकासी मारा । देईन अर्धराज्य भारा । कार्यसिध्दि झालिया ॥३॥ मग रिठासुर तो मायावी । गुंफिली रिठेमाळ अति बरवी । करी घेऊनियां सादावी । नंदचौबारा जाऊनि ॥४॥ म्हणे हे बाळका लेववितां । सर्वकाळ कंठी असतां । कोण्याहि भयाची तया वार्ता । स्पशोंचे नेणे सामर्थ्यगुणें ॥५॥ कदापिही नव्हे भूतबाध । दिठीचें भय नाहीं त्या कदा । ऐसें ऐकोनियां यशोदा । आवडी घाली हरिकंठी ॥६॥ निळा म्हणे पालखीं बाळ । निजऊनियां यशोदा वेल्हाळ । मेळऊनियां स्त्रिया सकळ । हास्यविनोदें बैसली ॥७॥