भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐकीं एकपणाचा घेउनियां त्रास । जाला नानाकार स्वरुपें बहुवस । म्हणोनि दुसरेंचि नाढळे वोयास । जयाततयामाजीं याचाचि रहिवास वो

aikin ekapanacha gheuniyan tras | jala nanakar svarupen bahuvas | mhanoni dusarenchi nadhale voyas | jayatatayamajin yachachi rahivas vo

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ऐकीं एकपणाचा घेउनियां त्रास । जाला नानाकार स्वरुपें बहुवस । म्हणोनि दुसरेंचि नाढळे वोयास । जयाततयामाजीं याचाचि रहिवास वो ॥१॥ ऐसे निजात्मया जाणोनि गोविंदा । जीवे भावें अनुसरल्या प्रमदा । करिती सेवावृत्ति निशिदिनी सदा । हसती रुसती करिती विनोदा वो ॥२॥ सर्वसाक्षी सर्वही जाणता । सर्व करुनियां म्हणावे अकर्ता । जीवीं जिवाचा हा आप्तचि सर्वथा । जेथें तेथें याची नित्य एकात्मता वो ॥३॥ नित्य अंगसंगें भोग त्यासि देति । दृष्टी अवलोकूनि गुण त्याचे गाती । नेऊनि एकांति वो निजगुज बोलती । करिती कामधाम परी त्याचिपासीं वृत्ति वो ॥४॥ सासु सासुरिया भ्रतारासी चोरी । नणंदा जावा त्याही त्यजूनियां घरीं । देती आलिंगन निजात्मया हरी । येथुनि म्हणती संसारा बोहरी वो ॥५॥ ऐशा निळा म्हणे झाल्या हरिरता । त्या त्या विराजती मुक्तिचिया माथा । नानासाधनांच्या लाजउनि चळथा । जाल्या असोनि संसारि नित्यमुक्ता वो ॥६॥