भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐकिलें मागें तारिले बहुता। धांवसी की आतां नाम घेतां

aikilen magen tarile bahuta| dhanvasi ki atan nam ghetan

रचनाकार: संत सेना · अभंग
ऐकिलें मागें तारिले बहुता। धांवसी की आतां नाम घेतां ॥१॥ बरव्यापरी मज ऐसे कळों आलें । म्हणउनी विठ्ठलें करी धावा ॥२॥ पडिला विसरू माझा तुजलागी। आतां पांडुरंगीं करणें काय ॥३॥ तुजलागि माझी नयेचि करुणा । धरिलें कीं जाण दुरीं मज ॥४॥ सेना म्हणे आतां सांभाळी नारायणा । जाऊं पाहे प्राण तुजसाठीं ॥५॥