भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐका संतसज्जन । निजहित कुशल पूर्ण । करुनी सर्वांगाचे कान । शब्दार्थ जाणावा

aika santasajjan | nijahit kushal purna | karuni sarvangache kan | shabdartha janava

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐका संतसज्जन । निजहित कुशल पूर्ण । करुनी सर्वांगाचे कान । शब्दार्थ जाणावा ॥१॥ जीवामाजीं घालुनी जीव । परिसतां हे अर्थगौरव । तैं सिद्धि पावे कार्य सर्व । भव विभव निवारे ॥२॥ असो आतां जानकीसी । मंदोदरी अति प्रीतीसी । पुसती झाली वेगेंसी । रामानुभव तो कैसा ॥३॥ सांगे एका जनार्दनीं । चित्त करा समाधान । अनुभवाचें लक्षण । सावधान ऐकावें ॥४॥