भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहोरात्र वाचे वदा । राम गोविंद नामची

ahoratra vache vada | ram govind namachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अहोरात्र वाचे वदा । राम गोविंद नामची ॥१॥ तेणें तुटे भेदाभेद । निरसे संसाराच्या कंद ॥२॥ ध्यानीं मनीं आणि शयनीं । वाचे वदा चक्रपाणी ॥३॥ ध्येय ध्याता ध्यान । आठवावें मधुसुदन ॥४॥ एका जनार्दनीं घोका । आवडीनें रामसखा ॥५॥