भजनी मालिका
← भजनांकडे परत

आहे आरुप बोलणें । नव्हे नाणें टांकसाळी

ahe arup bolanen | navhe nanen tankasali

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आहे आरुप बोलणें । नव्हे नाणें टांकसाळी ॥१॥ नका घेऊं खयासाठीं । येईल तुटी एखादी ॥२॥ आहतां ठसा कळे वरी । अभ्यंतरीं गैरसाळ ॥३॥ निळा म्हणे निवडुनी ठेवा । आतां देवा एकीकडे ॥४॥