भजनी मालिका
← भजनांकडे परत

आहारे निर्देवा काय करसी तप । वाउगाची जप शांतीविण

ahare nirdeva kay karasi tap | vaugachi jap shantivin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आहारे निर्देवा काय करसी तप । वाउगाची जप शांतीविण ॥१॥ आहारे पाररा नेणसी देवासी । वाउगा शिणसी काय काजा ॥२॥ आहारे तामसा कोण तुझी गती । संताची प्रचीति नाहीं तुज ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा हीनभागी । भूभार जगीं वायां जाहला ॥४॥