भजनी मालिका
← भजनांकडे परत

आहारालागीं करी देवाचें भजन । मिळे मिष्ठान्न भोजनासी

aharalagin kari devachen bhajan | mile mishthanna bhojanasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आहारालागीं करी देवाचें भजन । मिळे मिष्ठान्न भोजनासी ॥१॥ आहारालागीं करी तीर्थांचे भ्रमण । आहारें जिंकिलें मन सर्वपरी ॥२॥ आहारालागीं करी तीर्थप्रदक्षणा । आहारें व्यापिलें जनां एकमय ॥३॥ आहार निर्धार नाहीं जनार्दनीं । एका जनार्दनीं निराहार ॥४॥