भजनी मालिका
← भजनांकडे परत

अदृष्टी असेल जें जें वेळे । तें तें मिळेल तें तें काळें

adrushti asel jen jen vele | ten ten milel ten ten kalen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अदृष्टी असेल जें जें वेळे । तें तें मिळेल तें तें काळें ॥१॥ ऐशी प्रारब्धाची गती । ब्रह्मादिकां न चुकतीं ॥२॥ जें जें होतें ज्या संचितीं । ते तयासवें चालती ॥३॥ जैशी जैशी कर्मरेषा । तैसें भोगणें सहसा ॥४॥ एका जनार्दनीं भोग । भोगविल्याविण न चुके सांग ॥५॥