भजनी मालिका
← भजनांकडे परत

आदि मध्य अंत न कळे कोणासी । तो हृषीकेशी पंढरीये

adi madhya ant na kale konasi | to hrushikeshi pandhariye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आदि मध्य अंत न कळे कोणासी । तो हृषीकेशी पंढरीये ॥१॥ जया वेवादती साही दरुशनें । न कळे म्हणोन स्तब्ध जाहलीं ॥२॥ वेडावल्या श्रुति नेती पैं म्हणती । तो पुंडलिकाचे प्रीति विटे उभा ॥३॥ एका जनार्दनीं आनंदाचा कंद । उभा सच्चिदानंद भीमातीरीं ॥४॥