भजनी मालिका
← भजनांकडे परत

आदि अंत नाहीं जयाचे रुपासी । तोचि संतापाशीं तिष्ठतसे

adi ant nahin jayache rupasi | tochi santapashin tishthatase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आदि अंत नाहीं जयाचे रुपासी । तोचि संतापाशीं तिष्ठतसे ॥१॥ गातां गीतीं साबडें भावें तें कीर्तन । तेथें नारायण नाचतसे ॥२॥ योगियांची ध्यानें कुंठीत राहिलीं । संतनामामृतवल्ली गोड वाटे ॥३॥ एका जनार्दनीं संतसेवा जाण । घडती कोटी यज्ञ स्मरणमात्रें ॥४॥