भजनी मालिका
← भजनांकडे परत

आधी देव पाठीं भक्त । ऐसें मागें आले चालते

adhi dev pathin bhakta | aisen magen ale chalate

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आधी देव पाठीं भक्त । ऐसें मागें आले चालते ॥१॥ हेंहि बोलणेंचि वाव । भक्ता आधीं कैचा देव ॥२॥ भक्त शिरोमणी भावाचा । देव लंपट जाला साचा ॥३॥ भक्तासाठीं अवतार । ऐसा आहे निर्धार ॥४॥ वडील भक्त धाकुला देव । एकाजनार्दनीं नाहीं संदेह ॥५॥