भजनी मालिका
← भजनांकडे परत

अभिनव सांगतां विस्मयो दाटला । देहींच भासला देव माझ्या

abhinav sangatan vismayo datala | dehinch bhasala dev majhya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अभिनव सांगतां विस्मयो दाटला । देहींच भासला देव माझ्या ॥१॥ नवल कृपेंचें विंदान कैसें । जनार्दनें सरसें केलें मज ॥२॥ साधनाची आटी न करितां गोष्टी । हृदयसंपुष्टीं दाविला देव ॥३॥ एका जनार्दनीं एकपणें शरण । नवळे महिमान कांहींमज ॥४॥