भजनी मालिका
← भजनांकडे परत

अभेदावांचुन न कळे भक्तीचें महिमान । साधितां दृढ साधन । विठ्ठलरुप न कळे

abhedavanchun na kale bhaktichen mahiman | sadhitan drudh sadhan | viththalarup na kale

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अभेदावांचुन न कळे भक्तीचें महिमान । साधितां दृढ साधन । विठ्ठलरुप न कळे ॥१॥ येथें पाहिजे विश्वास । दृढता आणि आस । मोक्षाचा सायास । येथें कांहीं नकोची ॥२॥ वर्ण भेद नको याती । नाम स्मरतां अहोरात्री । उभी विठ्ठलमूर्ति । तयापाशीं तिष्ठत ॥३॥ आशा मनिशा सांडा परतें । कामक्रोध मारा लातें । तेणेंचि सरतें । तुम्हीं व्हाल त्रिलोकीं ॥४॥ दृढ धरा एक भाव । तेणें चरणीं असे ठाव । एका जनार्दनीं भेव । नाहीं मग काळाचें ॥५॥