भजनी मालिका
← भजनांकडे परत

अभेदाच्या द्वारापाशीं । तीर्थे प्रयागादि काशीं

abhedachya dvarapashin | tirthe prayagadi kashin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अभेदाच्या द्वारापाशीं । तीर्थे प्रयागादि काशीं ॥१॥ भक्तिमुक्तिचें माहेर । अभेदाचें तें घर ॥२॥ ऐसी अभेद भक्ति घडे । कामक्रोध तेथें दडे ॥३॥ एका जनार्दनीं शरण । अभेद भक्ति मुख्य ज्ञान ॥४॥