भजनी मालिका
← भजनांकडे परत

अभेद भक्तांचें निजमंदिर । तें मज निर्गुणाचें घर

abhed bhaktanchen nijamandir | ten maj nirgunachen ghar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अभेद भक्तांचें निजमंदिर । तें मज निर्गुणाचें घर ॥१॥ निर्गुणासी घर ठावो । बोलणें हेंचि दिशे वावो ॥२॥ सांडुनी आकाराचें ज्ञान । निराकारी सुखसंपन्न ॥३॥ सुखें सुखासी मिळणी । शरण एका जनार्दनीं ॥४॥