भजनी मालिका
← भजनांकडे परत

आभाविकांसी तो जवळीचा दुरीं । दुरीचा जवली हरी भाविकांसीं

abhavikansi to javalicha durin | duricha javali hari bhavikansin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आभाविकांसी तो जवळीचा दुरीं । दुरीचा जवली हरी भाविकांसीं ॥१॥ म्हणोनि आभावें ठाकतीं गोपिका । त्या यदुनायका न धरती ॥२॥ वावुगे ते कष्ट मनींचा तो सोस । सायासें सायास शिणताती ॥३॥ एका जनार्दनींशीण गोपीकांसी । तेणें हृषीकेशी हांसतांसे ॥४॥