भजनी मालिका
← भजनांकडे परत

अभक्त पातकी अपार । नामें पैल पार पावलें

abhakta pataki apar | namen pail par pavalen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अभक्त पातकी अपार । नामें पैल पार पावलें ॥१॥ ऐसं सोपें रामनाम । आणिकांसीतो विश्राम ॥२॥ नामें पावन होय त्रिजगती । वाचे जे वदतीं रामनाम ॥३॥ एका जनार्दनीं नाम । हरे श्रम बहुतांचा ॥४॥