भजनी मालिका
← भजनांकडे परत

अभागी तो जाण । न करी विठ्ठलस्मरण

abhagi to jan | na kari viththalasmaran

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अभागी तो जाण । न करी विठ्ठलस्मरण ॥१॥ तया व्यालीसे जननी । अभागी तो पापखाणी ॥२॥ न जाय पंढरपुरा । मांडी वेदान्त पसारा ॥३॥ एका जनार्दनीं म्हणे । श्वानापरी जायाचें जिणें ॥४॥