भजनी मालिका
← भजनांकडे परत

अभागी ते पामर । भोगिती नरक अघोर

abhagi te pamar | bhogiti narak aghor

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अभागी ते पामर । भोगिती नरक अघोर ॥१॥ जाहला बाइलेचा अंकित । वर्ते जाणोनी मनोगत ॥२॥ नावडे माता पितयाची गोष्टी । म्हणे हे बोलती चावटी ॥३॥ एका जनार्दनीं दुर्जन । पावती नरकीं ते पतन ॥४॥