भजनी मालिका
← भजनांकडे परत

ये माझ्या मंदिरा विठोबा उदारा

ye majhya mandira vithoba udara

रचनाकार: संत बोधले · अभंग
ये माझ्या मंदिरा विठोबा उदारा । तोडुनिया थारा अविद्येचा ॥ १ ॥ कुवासना कुबुध्दी मुळी हीन छेदी । अहंकारासी बंदी घालुनिया ॥२॥ घालुनी सिंहासन वरी बैसे आपण । स्वामी हे गुणरत्न पंढरीचे ॥३॥ बोधला म्हणे हरि किंकर तुझे द्वारी । नामक्रीडा करी अखंडित ॥४॥