भजनी मालिका
← भजनांकडे परत

विटेवरी मूर्ति दिसते सगुण सगुण

vitevari murti disate sagun sagun

विटेवरी मूर्ति दिसते सगुण सगुण । का निर्गुण म्हणू दादा ॥१॥ सगुण जरी म्हणू दिसते निर्गुण । वाचेचे भिन्न पडले दादा ॥२॥ वचन बुडाले स्तब्ध झाले मन । सगुण निर्गुण दोन्ही नाहीं ॥३॥ म्हणे मुक्ताबाई सांग ज्ञानदेवा । विचार हा बरवा करूनिया ॥४॥