भजनी मालिका
← भजनांकडे परत

विषये पाहे विख । याचे मानाल सुख

vishaye pahe vikh | yache manal sukh

रचनाकार: संत बोधले · अभंग
विषये पाहे विख । याचे मानाल सुख । आवडी खाऊ जाता पुढे । भोगसिल दुःख । तुझे तु भोगसिल । जन पाहती कौतुक ॥१॥ विषये पाही विख । जे जे सेवित गेले । बळेच उडी टाकुनी । आपण बुडाले । आपला गळा कापुनि । आत्महत्यारी जाले । तेंव्हा कोण सोडवील । येम जाचिते जाळी ॥ २॥ विषये पाही विख । नाही हाणित लाता । कृपाळु भगवंत त्यासी वाहिला माथा । कळिकाळा भय नाही ते नमिती सर्वथा ॥३॥ बोधला म्हणे विषयासि विटलो । कृपाळु त्यासी भेटलो | विषय जिंकोनिया पाहे । सुर पै जालो ॥४॥