भजनी मालिका
← भजनांकडे परत

उठा उठा हो रुक्माई सावध करा गोपाळा

utha utha ho rukmai savadh kara gopala

रचनाकार: संत बोधले · अभंग
उठा उठा हो रुक्माई सावध करा गोपाळा । फुली पहाट झाली पक्षांच्या वेळा ॥ १॥ होतो वाद्याचा गजर तुरे वाजती कहाळा । करी घेऊनिया आरत्या उभ्या गोपिका बाळा ॥ २॥ द्वारा उभे भक्तजन दोनी जोडुनी हात । तयास द्यावे दर्शन आम्हा करी सनाथ ॥३॥ नारद तुंबर उभे हरिगुण गात । छपन्न कोटी यादव ते ही मिळाले समस्त ॥४॥ बोधला म्हणे देवा मस्तकी ठेवा हात । जन्मोजन्मी द्वारी उभा हरिगुण गात ॥५॥