भजनी मालिका
← भजनांकडे परत

उठा अरुणोदय प्रकाश जाहला

utha arunoday prakash jahala

रचनाकार: अज्ञात · अभंग #काकड्याचे अभंग
उठा अरुणोदय प्रकाश जाहला । घंटा गजर गर्जित्रला। हरी चौघडा सुरू झाला । काकड आरती समयाचा ।।१।। महाद्वारीं वैष्णव जन । पूजा सामग्री घेऊन । आले द्यावे तयांसी दर्शन । बंदीजन गर्जती ।।२।। सभामंडपी कीर्तन घोष । मृदंग टाळ वीणे सुरस । आनंदे गाती हरीचे दास । परम उल्हास करूनियां ।।३।। चंद्रभागे वाळवंटी। प्रातः स्नानाचि जनदाटी। आतां येतील आपुले भेटी। उठी उठी गोविंदा ।।४।। ऐसे विनवी रुक्मिणी। जागृत जाहले चक्रपाणी। नामा बद्धांजुळी जोडूनि । चरणीं माथा ठेवितसे ।।५।।