भजनी मालिका
← भजनांकडे परत

उसाचे सेजारी येरंडाचें झाड नाहीं

usache sejari yerandachen jhad nahin

उसाचे सेजारी येरंडाचें झाड नाहीं । त्याचा पाड गोडी आली ॥१॥ । कर्पूरासी जाला दीपाचा शेजार । काय गुर्णे सार राहिल त्याचा ॥२॥ सागरीं लवण टाकिलें नेऊन । काय गुण खडेपण उरलें त्याचें ॥३॥ तैसा नामदेव विठोबाच्या जागा । काय गुर्णे या गा कोरेपण ॥४॥ म्हणे मुक्ताबाई चंदनाचें झाड । अहंतासर्प वेढे गुंडाळिले ॥५॥