भजनी मालिका
← भजनांकडे परत

उर्णाचिया गळां बांधली दोरी

urnachiya galan bandhali dori

उर्णाचिया गळां बांधली दोरी। पाहों जाय घरीं तंव तंतु नाहीं ॥१॥ तैसें झालें बाई जंव एकतत्त्व नाहीं । दुजी जंव साई तंव है अंध॥२॥ ऐसी मी हो अंध जात होतें वायां । प्रकृति सावया पावली तेथें ॥३॥ मुक्ताई सावध करी निवृत्तिराज । हरिप्रेमें उमज एकतत्त्वें ॥४॥