भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझीया सत्तेने हाले तुझीया सत्तेने बोले

tujhiya sattene hale tujhiya sattene bole

रचनाकार: संत बोधले · अभंग
तुझीया सत्तेने हाले तुझीया सत्तेने बोले । सांग विठ्ठल माये माझे ॥१॥ साच की लटके विचारी मनासी । हा बोला कोणासी ठेवसील ॥ २॥ हे मृतिकेचे भांडे भुसी वोतीयेले । वोंकारे फोडिला टाहो तेथे ॥३॥ सकळ देहीचा चाळकु बुधी खेळवणा । तुची एकु, नाही बा आणिक दुजा तेथे ॥४॥ सकळ मंडण चालविता तुझी करणी गा अनंता । दुजा हा सर्वथा नाही कोणी ॥५॥ बोधला म्हणे हे वचन निर्धारी । अवघा तूची सुत्रधारी तु आमचा कैवारी पांडुरंगा ॥६॥