भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझीया भेटीला जीव माझा तळमळी

tujhiya bhetila jiv majha talamali

रचनाकार: संत बोधले · अभंग
तुझीया भेटीला जीव माझा तळमळी । केधवा वनमाळी येईल घरा ॥१॥ येई गा बा हरि माझ्या प्राणनाथा । जीव जाईल आता करु काय ॥ २ ॥ माझिया देहीचा बैसकार केला । का रे नाही आला विठोबा माझा ॥३॥ येई गा कृपानिधी बैस माझ्या घरि । तुज आता नाही उरी संसाराची ॥४॥ हळुच तुज बुध्दी बैसविन घरि । तुज म्हणे अवतारी जाऊ नेदी ॥५॥ बोधला म्हणे देवा कोण माझा केवा । आता येऊन द्यावा प्रेमपान्हा ॥६॥