भजनी मालिका
← भजनांकडे परत

सूर्यातें निवटी चंद्रातें घोंटी

suryaten nivati chandraten ghonti

सूर्यातें निवटी चंद्रातें घोंटी । उन्मनि नेहटीं बिंबाकार ॥ १ ॥ तें रूप सावळें योगियाचें हित । देवांचें दैवत कृष्णमाये ॥ २ ॥ सत्रावी उलंडी अमृत पिऊनि । ब्रह्मांड निशाणी तन्मयता ॥ ३ ॥ निवृत्ति अंबु हें वोळलें अमृत । गोकुळीं दैवत नंदाघरीं ॥ ४ ॥