भजनी मालिका
← भजनांकडे परत

सिद्धीचे साधन नेणती

siddhiche sadhan nenati

सिद्धीचे साधन नेणती । ते सिद्ध अधिक उद्धोध आनंदाचा ॥१॥ तें रूप सांवळें देवकीये लीळे । भोगिती सोहळे कृष्णरूपें ॥२॥ उन्मनी अवस्था लाविती ते मुनी । अखंडता ध्यानीं कृष्णसुख ॥३॥ निवृत्ति ठकार श्रुतीचा आकार । गोपाळ साकार अंकुरले ॥४॥