भजनी मालिका
← भजनांकडे परत

शून्यापरतें पाही तंव शून्य तेंही नाहीं

shunyaparaten pahi tanv shunya tenhi nahin

शून्यापरतें पाही तंव शून्य तेंही नाहीं । पाहाते पाहोनि ठायीं ठेवियलें ॥१॥ कैसागे माये हा तारकु दिवटा। पंढरी वैकुंठा प्रगटला ॥२॥ न कळे याची गती आदि मध्य अंतीं । जेथें श्रुति नेति नेति प्रगटल्या ॥३॥ मुक्ताई सप्रेम विठ्ठल संभ्रम । शून्याहि शून्य समशेजवाजे ॥४॥