भजनी मालिका
← भजनांकडे परत

सासुची सुन एक पाणिया गेली

sasuchi sun ek paniya geli

रचनाकार: संत बोधले · अभंग
सासुची सुन एक पाणिया गेली । पाणी फोडुनी तिने घागर आणली ॥१॥ भ्रतार मारुन भावासव गेली । बापाची बाइल पुत्रे नेली ॥ २॥ ऐक रे खेळिया नवल जाले । नाही ते डोळा देखिले रे ॥३॥ बोधला म्हणे गुरुखुण ओळखिले । देखोनि जवळ जाले रे खेळिया ॥४॥