भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वांतुनी वेगळा हाती कैसा येई

sarvantuni vegala hati kaisa yei

सर्वांतुनी वेगळा हाती कैसा येई | म्हणे मुक्ताबाई सांगा दादा ॥१॥ दहा पवनांचा खेळ योगी खेळती । ओडोनियां नेती ब्रह्मांडांत ॥२॥ कुंडलिनी निवटोनि करिती आकर्षण | रेणूचे दर्शन झाले कीं नाहीं ॥३॥ म्हणे मुक्ताबाई सांगा ज्ञानेश्वरा | चुके येरझारा चौन्यांशीव्या ॥४॥