भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्व सर्व सुख अहं तेचि दुःख

sarva sarva sukh ahan techi duhkh

सर्व सर्व सुख अहं तेचि दुःख । मोहममता विष त्यजीयेलें ॥१॥ साधक बाधक करूनि विवेक । मति मार्ग तर्क शोधियेला ॥२॥ सर्वतीर्थ हरि दुमाळु धनुवो। चोळला कणवा चातकाचा ॥३॥ सूक्ष्ममार्ग त्याचा भक्त देहीं मायेचा। आकळावयाचा सत्त्व घरीं ॥४॥ वेद जंव वाणी श्रुति तुपें । काहाणी ऐको जाय । कर्णी तंव परता जाय ॥५॥ मुक्ताई सोहंभावें भरलें दिसे देवें। मूर्तामूर्त सोहंभावे हरि घोटी ॥६॥