भजनी मालिका
← भजनांकडे परत

सार निःसार निवडूनि टाकीन

sar nihsar nivaduni takin

सार निःसार निवडूनि टाकीन । सर्व हा होईन आत्माराम ॥ १ ॥ राम सर्वा घटीं बिंबलासे आम्हां । पूर्ण ते पूर्णिमा सोळाकळी ॥ २ ॥ न देखों दूजें हरिविण आज । आणिकाचें काज नाहीं तेथें ॥ ३ ॥ निवृत्ति गौरव गुरुमुखें घेत । आपणचि होत समरसें ॥ ४ ॥