भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत पाहुणे सज्जनाचे घरी पूजा

sant pahune sajjanache ghari puja

संत पाहुणे सज्जनाचे घरी पूजा । करितां वरी डोई काढी ॥१॥ करितां सन्मान अंगी भरे ताटा । देवा पै करंटा असुनी काय ॥२॥ अहंता हा खुंट वाढविला चित्तीं । न साहे संगती सजनाची ॥३॥ पंढरीचें भूषण सांगतो जनांसी । नाहीं या मनासी तीळ बोध ॥४॥ म्हणे मुक्ताबाई चांगदेवा वाणी । भजावा सज्जनीं नामदेव ॥५॥