भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसार दुःखमूळ हे तव भव सबळ

sansar duhkhamul he tav bhav sabal

रचनाकार: संत बोधले · अभंग
संसार दुःखमूळ हे तव भव सबळ । यालागी भुलो नको । चित्ती धरा गोपाळ ॥१॥ आरे सावध होई आता । तोडी भवमूळ व्यथा । सद्गुरूसी शरण जाई । कृपा करील रे आता ॥२॥ आरे माया कठिन भारी। घाली दुःखाचे घरी । दुःख हे सोसवेना । चढे विखाची लहरी ॥३॥ अरे सुख जरी भोगिसील तरी । जवळिच आहे विश्वास न धरिसी वरि सांगोन काये ॥४॥ सार्थक करिसील सांगतो वचन । दृढ चित्ती धरी तुज विठोबाची जाण ॥ ५॥ बोधला म्हणे जना का रे हित विचाराना । विठाई माऊली देते प्रेमाचा पान्हा ॥६॥