भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकाळी उठोनी हरिचे नाम उच्चारा

sakali uthoni hariche nam uchchara

रचनाकार: संत बोधले · अभंग
सकाळी उठोनी हरिचे नाम उच्चारा । नाम उच्चारिता तुटे पातक थारा ॥१॥ हरिचे जे नाम ज्याच्या येईल वाचे । ते नर सदैव भाग्याचे । ते ऐक जीव दैवाचे ॥ २॥ हरिचे जे नाम जे जे उच्चारित गेले । हरिरुप होऊन ते नर वैकुंठी ठे ॥३॥ बोधला म्हणे देवा नाम उच्चारित गेलो । नाम उच्चारिता विठ्ठल पायी विनटलो ॥४॥