भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळ सखियास करितसे विनंती

sakal sakhiyas karitase vinanti

रचनाकार: संत बोधले · अभंग
सकळ सखियास करितसे विनंती । समजावुनि द्या मज ॥ १ ॥ रामाचे भेटीला मन हे उदासीन । नव्हे समाधान काही केल्या ॥२॥ व्यर्थ माझा देहे। जात असे वाया । भेटावया देवराया जिवलगा ॥३॥ मग सकळिका मिळोनी एकरुप जाल्या । घेउनी राम आल्या घरा माझ्या ॥४॥ बोधला म्हणे आनंद जाला । सेजे पडला राम माझा ॥५॥