भजनी मालिका
← भजनांकडे परत

रेणु तें निरंजन अणू तेचि

renu ten niranjan anu techi

रेणु तें निरंजन अणू तेचि | माया माया वचनी | देह निपजला ॥१॥ नाही अक्षराचा आधार मेरुशीं । हे तो नाभीपाशीं स्थापियले ॥२॥ दोही मधोनियां निघाले वचन । वेदाचें जन्मस्थान तेंचि बाई ॥३॥ दहा पवनांचा एक झाला मेळा | रेणूचा जिव्हाळा सर्वांसी हा ॥४॥ सर्वांतुनी वेगळा रेणू तो अचळ । म्हणे ज्ञानेश्वर मुक्ताबाई ॥५॥