भजनी मालिका
← भजनांकडे परत

राम नांदतो सर्वांच्या अंतरी

ram nandato sarvanchya antari

रचनाकार: संत बोधले · अभंग
राम नांदतो सर्वांच्या अंतरी । बाहेर मी तरी तोचि एक ॥१॥ प्रकृतीच्या मुळे झाकुळला पाही । तेणे तुम्हा काई न दिसे ॥ २॥ दर्पणीचा मळ काढोनि टाकिले । तेणे दाखविले रुप तुझे ॥३॥ देहीचा मळ काढोनि सांडी । राम तेथे मांडी जगदरुप ॥४॥ मग जे इच्छीसी ते तु फळ पावशी । कल्पतरु तुजपाशी जवळी आहे ॥५॥ कल्पियले फळ नित्य देत आहे । सत्य आपुले पाहे जतन करी ॥६॥ सत्यासी साहाय भगवंत आहे । कामधेनु पाहे दुधे तेथे ॥७॥ बोधला म्हणे सत्य सांगतो वचन । वाहतसे आण विठोबाची ॥८॥