भजनी मालिका
← भजनांकडे परत

राम माझा बाप । राम माझी माये

ram majha bap | ram majhi maye

रचनाकार: संत बोधले · अभंग
राम माझा बाप । राम माझी माये । राम निजसोय दाखविली ॥१॥ राम माझ भाव। राम माझी बहिण । राम अंत:करणी । सदा वाये ॥ २ ॥ माये आणी बाप । भाऊ या बहिणी । गोवियेले यांनी मायाजाळी ॥३॥ कोण्ही न विचारी । माझे काही हित । भुलविले चित्त नानापरी ॥४॥ बापे पांडुरंगे कैसी कृपा केली । त्याणे माझी केली काढाकाढी ॥५॥ बोधला म्हणे देवा । मी तुझे अनाथ । उध्दरी पतित पडिलो द्वारी ॥६॥