भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रपंचाच्या डोही बुडत होतो पाही

prapanchachya dohi budat hoto pahi

रचनाकार: संत बोधले · अभंग
प्रपंचाच्या डोही बुडत होतो पाही । काढिले लवलाही पांडुरंगे ॥१॥ बहुत जाल्या तुझ्या उपकाराच्या रासी । सांगा संतापासी घडी घडी ॥ २॥ ऐसे मागे बहुत ऐकत होतो कानी । ते तो मजलागुनी केले बापा ॥३॥ बोधला म्हणे तुझी वाखाणिता कीर्ती । सांगो संता प्रती तुझे गुण ॥४॥